तहसिलदार सुनील सावंत यांना मागण्यांचे निवेदन देताना तलाठी व मंडळाधिकारी संघटना
वैजापूर
तलाठी व मंडळाधिकारी यांच्याकडे असलेली आयटी उपकरणं (लॅपटॉप व प्रिंटर स्कॅनर) जीर्ण व निकामी झाल्याने ही उपकरणे तातडीने बदलून मिळण्यासाठी मंडळाधिकारी व तलाठी संघटना १५ डिसेंबर पासून बेमुदत संपावर गेल्या आहेत. संपा दरम्यान संघटनांनी त्यांच्याकडील डीएससी (डिजिटल सिग्नेचर स्कॅनर) देखील प्रशासनाकडे जमा केले आहेत.
या संबंधी संघटनेकडून देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्य तलाठी संघाची शहादा जिल्हा नंदुरबार येथील १३ डिसेंबर रोजी झालेल्या बैठकीमध्ये झालेल्या निर्णयाप्रमाणे व महाराष्ट्र राज्य तलाठी संघाची राज्य कार्यकारणी संलग्न असलेले वैजापूर तालुका तलाठी संघाने राज्यसंघाच्या २८ नोव्हेंबर रोजीचा निवेदनात नमूद केलेल्या प्रमुख मागण्या शासनाने गांभीर्याने न घेतल्यामुळे हा संप पुकारला आहे.
काय आहेत मागण्या ?
ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) व मंडळ अधिकारी यांच्याकडे सध्या असलेली आयटी उपकरणे लॅपटॉप व प्रिंटर स्कॅनर पूर्णतः जीर्ण व निकामी झालेली आहेत. ही उपकरणे तातडीने बदलून नवीन उच्चक्षमतेची लॅपटॉप व प्रिंटर कम स्कॅनर उपलब्ध करून देण्यात यावीत. ई-पिक पाहणी मंजूरी व्यतिरिक्त इतर कोणतीही अतिरिक्त जबाबदारी ग्राम महसुल अधिकारी (तलाठी) व मंडळ अधिकाऱ्यांवर टाकण्यात येऊ नये. (शासन दरबारी तलाठी संघाच्या इतर मागण्या प्रलंबित आहेत.)
उपरोक्त मागण्यांबाबत जमाबंदी आयुक्त राज्य शिष्टमंडळास २७ ऑक्टोबर पर्यंत निविदा प्रक्रिया पूर्ण करून नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात उपकरण वाटप सुरू करण्याचे तोंडी आश्वासन दिले होते. परंतु १३ डिसेंबर अखेर पर्यँत कोणताही शासनादेश निर्गमित झालेला नाही. याशिवाय उपकरण वाटप प्रक्रिया देखील पूर्णपणे थांबलेली आहे.


.jpg)
Social Plugin