वैजापूरमध्ये बनावट मोबाईल उत्पादन विक्रत्यांविरुद्ध गुन्हा दाखल..



लाखोंचा मुद्देमाल जप्त....

वैजापूर 
छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कॉपीराईट कायद्याचे उल्लंघन करत 'एमआय'  मोबाईल कंपनीच्या बनावट साहित्याची विक्रीचा प्रकार उघडकीस आणला असून त्यांच्याविरुध्द वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. कारवाई दरम्यान पोलिसांनी  १३ लाख ५० हजार ८१५ रुपये  किंमतीचे बनावट साहित्य जप्त केले.  याप्रकरणी चार दुकान मालकांविरुद्ध वैजापूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवाराम विराजी देवासे,  गोपाल आसाराम देवाशी,  रमेशकुमार चंन्नाराम चौधरी व नकुलसिंग उत्तमसिंग राठोड (सर्व रा.वैजापूर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनायक घणश्याम वळवईकर (वय ५०, रा. रूम नं. ०७, पितृकृपा सोसायटी, कुरार व्हिलेज, मालाड ईस्ट, मुंबई ९७) हे
नेत्रिका कन्सल्टिंग इन्व्हेस्टिगेशन या कंपनीत तपासणी तज्ञ म्हणून कार्यरत आहेत.  त्यांची कंपनी 'नेत्रिका कन्सल्टिंग इन्व्हेस्टिगेशन' ही 'एमआय' या मोबाईल कंपनीच्या नावाचा आणि त्यांच्या लोगोचा वापर करून विविध बनावट उत्पादने विकली जात असल्याचे प्रकार शोधून त्यावर कारवाई करण्याचे कार्य करते. अशा प्रकारे बनावट साहित्याची नक्कल करून विक्री करणाऱ्यांविरुद्ध कॉपीराईट कायद्यांतर्गत कारवाई 
करण्यासाठी कंपनीने वळवईकर यांना अधिकृत अधिकारपत्र दिले आहे. त्यांना मिळालेल्या माहितीनुसार वैजापूर शहरातील काही दुकानदार 'एमआय' या मोबाईल कंपनीचे मोबाईल कव्हर, मोबाईल ग्लास, मोबाईल डिस्प्ले, मोबाईलचे बँक कव्हर, मोबाईलचे पोको पॅनल आणि मोबाईल चार्जर वायर इत्यादी साहित्यांचे बनावटीकरण करून तयार केलेल्या मालाचा मोठा साठा होलसेल आणि किरकोळ स्वरूपात विक्री करत असल्याचे समजले. या प्रकारानंतर वळवईकर यांनी 
 पोलीस कारवाई व्हावी यासाठी पोलीस अधीक्षक, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण यांच्या कार्यालयात लेखी तक्रार अर्ज सादर केला होता. अखेर  १० डिसेंबर  रोजी सकाळी साडे दहा वाजता छत्रपती संभाजीनगर येथील स्थानिक गुन्हे शाखा (ग्रा) पोलिसांच्या सोबतीने त्यांनी शहरातील'चामुंडा मोबाईल शॉपी', 'महादेव मोबाईल शॉपी',', 'रामदेव मोबाईल शॉपी' आणि 'माताजी मोबाईल .या दुकानांवर छापा टाकला. छाप्या दरम्यान त्यांनी १३ लाख ५० हजार ८८५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. मात्र कारवाई दरम्यान त्यांना शिरीष मोबाईल शॉपी व लक्ष्मी मोबाईल शॉपी या दोन्ही दुकाना बंद दिसून आल्या.