भगवंताला संतांच्या सान्निध्यात सुख : स्वामी परमानंदगिरीजी महाराज


वैजापूर 

"भगवंताला सुख वैकुंठात मिळत नाही तर ;भगवंताला खरे सुख संत-महंतांच्या सान्निध्यात प्राप्त होत असते" असे अमृत तुल्य वचन भांगसीमाता गड येथील श्री.श्री. १००८ महामंडलेश्वर महंत स्वामी परमानंदगिरीजी महाराज यांनी गुरुवार(ता.०४)रोजी येथील परमपूज्य ब्रह्मलिन दत्तगिरीजी आश्रमात राष्ट्रसंत जनार्दनस्वामीबमौनगिरीजी (बाबाजी) यांच्या ३६व्या  पुण्यस्मरण दिन निमित्त आयोजित  कार्यक्रमात केलं.ते पुढे म्हणाले की,"निष्काम कर्मयोगी बाबाजी यांनी आपले संपूर्ण आयुष्य लोकांच्या हितासाठीच वेचले".या प्रसंगी संत पिठावर स्वामी दत्तगिराजी महाराज यांचे उत्तराधिकारी महंत ज्ञानानंदगिरीजी महाराज यांची उपस्थिती होती.आरंभी बाबाजींची आरती व अभिवादन झाले.

सामाजिक कार्यकर्ते धोंडीरामसिंह राजपूत यांनी आपल्या प्रास्तविकात आयोजित कार्यक्रम श्रीमद भागवत ज्ञानयज्ञ सोहळा, प्रवचन,काकड आरती, जपानुष्ठान सोहळ्याची माहिती दिली.आश्रमचे सेवेकरी  रामदास दाणे, सुनील मोटे, रामकृष्ण पुतळे, बंडू वाघ, राजू व्यवहारे,संजय महाजन,भास्कर गायकवाड, किशोर नाईकवाडी,बाजीराव निकम यांनी महाराजांचे पूजन केले. प्रवचनानंतर उपस्थित सर्व  भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.सेवेकरी हरिभाऊ शिंदे, नितीन इंगळे, विजय वाणी, हरिभाऊ निकम,संतोष साळुंके,राधेश्याम जगताप, दत्तू आहेर,अमोल बनकर, शंभू शिंदे, सुभाष नाईकवाडी,भागीनाथ महाजन,सुरेश गायकवाड,अशोक नाईकवाडी, हर्षद राजपूत, बापू गावडे, बाबुराव वाणी यांनी सहभाग नोंदविला. सूत्रसंचलन धोंडीरामसिंह राजपूत यांनी तर आभार रामकृष्ण पुतळे यांनी मानले.