वैजापूर पालिका कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा पगार पूरग्रस्तांना



वैजापूर
यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांसह कष्टकरी नैसर्गिक आपत्तीत सापडले. या पार्श्वभूमीवर वैजापूर नगर पालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी त्यांचे एक दिवसाचे वेतन आपद्ग्रस्तांना देण्याचे ठरविले. दरम्यान पालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक भागवत बिघोत  यांनी  दिवाळीनिमित्त पालिकेच्या कामगारांना गणवेश व मिठाई वाटप केले.  

शनिवार (ता.१८) रोजी माजी नगराध्यक्षा शिल्पा परदेशी, माजी उपनगराध्यक्ष साबेरखान व सामाजिक कार्यकर्ते धोंडिरामसिंह राजपूत यांच्या हस्ते हे साहित्य वाटप करण्यात आले. याशिवाय येत्या काही दिवसांत पालिका कर्मचारी व कामगारांचे सर्व देयके अदा करण्यात येतील असे मुख्याधिकारी  बिघोत यांनी यावेळी सांगितले. 


या कार्यक्रमाला आमीरअली, वैशाली पवार, सुनीता महाले यांचीही उपस्थिती होती. ल कार्यक्रमादरम्यान नित्यनियमाने स्वच्छतेचे कर्तव्य बजावणाऱ्या सफाई कामगार परिघाबाई मोरे यांना माजी उपनगराध्यक्ष साबेरखान यांनी विशेष बक्षीस देऊन त्यांच्या कार्याचे कौतुक केले. याप्रसंगी माजी नगराध्यक्षा शिल्पा परदेशी, साबेरखान, धोंडीरामसिंह राजपूत यांची भाषणे झाली. या सर्वांनी पालिका कामगार यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी प्रमोद निकाळे, रमेश त्रिभुवन, विष्णू आलूले, वाल्मिक शेटे, अरुण कुलकर्णी, मंगेश नाईकवाडी यांची उपस्थिती होती.  यावेळी मुख्याधिकारी बिघोत यांनी उपस्थितांचे आभार मानले.