अखेर 'त्या'शेजाऱ्याविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल
वैजापूर
आजोबाचा बंद पडलेला मोबाईल सुरू करण्यासाठी घेऊन गेलेल्या एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचा शेजाऱ्यानेच विनयभंग केल्याची घटना तालुक्यातील एका गावात घडली. याप्रकरणी वैजापूर पोलिस ठाण्यात शेजाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेतील पीडित मुलगी ही इयत्ता आठवीच्या वर्गात गावातच शिक्षण घेत आहे. दरम्यान ०२ सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता तिच्या आजोबांचा मोबाईल बंद पडल्याने मोबाईल चालू करण्यासाठी ती शेजाऱ्याकडे मोबाईल घेऊन गेली. ती तिथे जाताच शेजाऱ्याने तिचा हात पकडून तिच्या मनाला लज्जा वाटेल असे कृत्य करून तिचा विनयभंग केला. पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून शेजाऱ्याविरुद्ध विनयभंगासह बाललैंगिक अत्याचार व इतर कलमान्वये वैजापूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पिंक पथकाच्या पोलिस उपनिरीक्षक मनीषा जगताप या करीत आहेत.

Social Plugin