Devtional News: संत शिरोमणी सावता महाराज यांच्या ७२९ व्या पुण्यतिथी विविध कार्यक्रम

वैजापुरात संत सावता महाराज व संत नामदेव महाराजांना अभिवादन

वैजापूर 
संत शिरोमणी  सावता माळी महाराज यांच्या ७२९ व्या पुण्यतिथी निमित्ताने व संत नामदेव महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त बुधवार (ता.२३)रोजी शहरातील माळी गल्ली येथील संत सावता महाराज मंदिरात भागवताचार्य ह.भ.प. गोवर्धन महाराज देवळे यांच्या उपस्थितीत अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला.


यावेळी गौतम गायकवाड,सजनराव गायकवाड, रतीलाल गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते धोंडीरामसिंह राजपूत तसेच जेष्ठ नागरिक सिता गायकवाड,सुमनबाई गायकवाड, जिजाबाई  गायकवाड यांनी संत सावता महाराज यांच्या  चरणी पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी धोंडीरामसिंह राजपूत यांनी संत सावता महाराज यांच्या जीवन चरित्रा बाबत माहिती दिली.गौतम गायकवाड यांनी प्रास्ताविक केले तर सजनराव गायकवाड यांनी आभार मानले. या प्रसंगी रविंद्र गायकवाड,विजय गायकवाड, सुनील गायकवाड,संजय गायकवाड,तुकाराम गायकवाड,अशोक गायकवाड उत्सव समिती सदस्य व सर्व भजनी मंडळी उपस्थित होते. या निमित्ताने गेल्या आठ दिवसापासून संत सावता महाराज मंदिरात काकड आरती, हरिपाठ,भागवत कथा, कीर्तन व प्रवचन सुरू आहे. दरम्यान गुरुवारी काल्याचे कीर्तन,प्रवचन ,प्रतिमा मिरवणूक व महाप्रसादाचे वाटप संत सावता महाराज मंदिर व ओंकारेश्वर मंदिर आनंदनगर स्टेशन येथे  होणार आहे.