Blood Donation camp : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जन्मदिवसानिमित्त वैजापूरात महारक्तदान शिबिर

पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून उस्फुर्त प्रतिसाद

वैजापूर 

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस यांच्या जन्मदिवसानिमित्त शहरातील भगवान महावीर रुग्णालयात मंगळवार(ता.२२) रोजी आयोजित महारक्तदान शिबिरात रक्तदात्यांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला.


भारतीय जनता पक्षाच्यावतीने आयोजित या महारक्तदान शिबिराला माजी नगराध्यक्ष डॉ.दिनेश परदेशी,हेडगेवार बँक चेअरमन प्रशांत कंगले,गोकुळ भुजबळ,संदीप ठोंबरे, शैलेश चव्हाण,राजेश गायकवाड, कैलास पवार,सुरेश तांबे,धनंजय धोर्डे, गौरव दौडे,गोरख काळे,प्रेम राजपूत,शुभम राजपूत, विनोद राजपूत,शैलेश पोंदे, सन्मित खनिजो, धोंडीरामसिंह राजपूत तसेच पक्षाच्या महिला आघाडीच्या जयमाला वाघ,अनिता तांबे, वैशाली पवार, स्वरूपा इंगळे, शीतल राजपूत,उज्वला शेटे, विद्या घाटे,ज्योती आंबेकर,प्रीती बांठिया, निर्मला जाधव, अशोक गाडेकर यांनी सहभाग नोंदविला. छत्रपती संभाजीनगर येथील दत्ताजी भाले रक्तपेढीने या शिबिरात रक्त संकलित केले. रक्तपेढीचे आप्पासाहेब सोमासे यांनी ही प्रक्रिया पूर्ण करण्यात  सहभाग नोंदविला.