घरासमोरून कार चोरी

शहरातील जीवनगंगा वसाहतीतील घटना

वैजापूर

शहरातील जीवनगंगा वसाहतीतून एका घरासमोर उभी असलेली कार चोरट्याने चोरून नेल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. याप्रकरणी वैजापूर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


        
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केतन अजित रामैय्या यांचा मंडप डेकोरेशनचा व्यवसाय असून ते स्टेशन रोडलगत असलेल्या जीवनगंगा वसाहतीत रहिवासास आहेत. दरम्यान २७ जुलै रोजी पहाटेच्या सुमारास त्यांनी घरासमोर उभी केलेली त्यांची दीड लाख रुपये किंमतीची कार (एमएच २० एफपी ३८१२) अज्ञात चोरट्याने चोरून नेली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरटयाविरुद्ध वैजापूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय शहरातील बालाजीनगर येथील रहिवासी अमृतकुमार विलासराव वाघ यांच्या घरासमोरून देखील त्यांची ३० हजार रुपये किंमतीची युनिकॉन (एमएच २० ईयु १७५३) मोटारसायकचे हँडल लॉक तोडून चोरटयाने चोरून नेली. याप्रकरणी त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चोरट्याविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.