वैजापूर-गंगापूर महामार्गावरील चिंचडगाव येथील सदगुरु नारायणगिरी कन्या आश्रमात राहणाऱ्या ह.भ.प. संगीता (ताई) आण्णासाहेब पवार (५०) यांची अज्ञात व्यक्तींनी डोक्यात दगड घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना शुक्रवार (ता.२७) रोजी मध्यरात्री सुमारास घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान खुनाचा उद्देश अद्याप अस्पष्ट आहे.
संगीता (ताई) पवार या मागील दोन महिन्यांपासून चिंचडगाव येथील सदगुरु नारायणगिरी कन्या आश्रमात वास्तव्यास होत्या. त्या अविवाहित असून, त्यांनी संन्यास स्वीकारला होता. परिसरात त्या किर्तनकार म्हणून ओळखल्या जात होत्या आणि नियमितपणे किर्तनाचे कार्यक्रम करत असत. दररोज रात्री त्या आश्रमातील आपल्या खोलीतच झोपत असत, परंतु बुधवारी रात्री त्या खोलीबाहेर झोपल्या होत्या, अशी माहिती समोर आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास काही अज्ञात व्यक्तींनी आश्रमाचे गेट आणि कुलूप तोडून आत प्रवेश केला. या व्यक्तींनी संगीता ताई पवार यांच्या डोक्यात मोठा दगड टाकून त्यांची हत्या केली.
Social Plugin