Crime News महिलेची मंगळसूत्र हिसकावले : चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

 

वैजापूर
घराबाहेर पडवीत झोपलेल्या महिलेच्या गळ्यातील ४५ हजारांचे मणी मंगळसूत्र चोरून चोरट्याने धूम ठोकल्याची घटना २४ जून रोजी रात्रीच्या सुमारास तालुक्यातील एका शेतवस्तीवर घडली. 

याप्रकरणी विरगाव पोलीस ठाण्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


       याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, भामबाई गायकवाड या तालुक्यातील महालगाव परिसरात अकोलेवाडगाव रस्त्यालगत शेत वस्तीवर रहिवासास आहेत. 

दरम्यान मंगळवारी रात्री त्यांनी सहकुटुंब सुमारास जेवण केले. या नंतर त्या घरासमोरील पडवीत तर मुलगा व सून घरात झोपी गेले. मध्यरात्री भामबाई यांना अचानक जाग आली व त्यांच्या गळ्यातून कुणीतरी मंगळसूत्र काढत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. 

यावेळी त्यांनी आरडाओरड केली असता चोरट्याने त्यांच्या गळ्यातील मनी मंगळसूत्र काढून त्याठिकाणाहुन पळ काढला. याप्रकरणी भामबाई गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्यांचे ४५ हजार रुपये किंमतीचे मणी मंगळसूत्र चोरी करणाऱ्या चोरट्याविरुद्ध विरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.